Thursday, June 21, 2007

आपलं प्रिंशिपल है बंधो!

चांगभलं दादांनू, सदानंदाचा येळकोट घ्या तायांनू!

"आरं पन माजं आयकून तं घेशील की नाय मर्दा! आरं लेका झेंगट्या, तू हितं आलास म्हून मी आलो, त्वा सांगितलंस की आता त्या गावाच्या वाटंलादिकील जायाचं न्हाय, म्हून मीबी तिकडं सा म्हैन्यात न्हायी गेलो, आन आता तू म्हनतुयास की हितनंबी आता गाशा गुंडाळायचा, तवा कसंकसं?"

"कसंकसं म्हंजी? छगन्या, तू कायी माजी लग्नाची बाईल न्हवंस. भटाबामनासमोर डोरलं न्हायी घातलं म्या तुज्या गळयात. तुला संगट यायचं तं ये, न्हायतर ऱ्हायलं, पन मी आता हितनं जानार म्हंजी जानार. आरं आपल्याला काय दुसरी गावं न्हायती का? आरं आपुन जितं जाऊ तितं गाव गोळा करु, कळ्ळं का? आपुन कलाकार आदमी है राजा! नुस्ता मिस्सळपावचा गाडा उगडला तर हजारानं गिराईक यील. कुनाचं मिंदं हून ऱ्हायला आपुन काय तुज्यावानी छगन हाय का?"

"आरं दादा, मला काय ठाव न्हाय का त्ये? आन तुला सोडून जायचं आस्तं तर इतवर का आलु अस्तू मी तुज्यासंगट? आरं तू दोस्त आपला झेंगट्या! तू क्रिष्न तर आपुन सुदामा, तू मुन्ना तर आपुन सर्किट"

"व्हय न्हवं? मग एक सबुद न बोल्ता आपलं गटुरं बांद बगू! आरं जितं आपली इज्जत न्हाय तितं मुर्दाडपनानं ऱ्हायला आपुन काय आक्करमाशे हाय का? त्या आदीच्या गावात इक्ती वरसं ऱ्हायलो, आपला गोतावळा गोळा केला, पन सरपंचाबरुबर एकदा भांडान झालं तवा म्हनलं अन्ना, आमचा रामराम घ्या. हितं आजवर राजा म्हून ऱ्हायलोय, आता आमाला तुमी खरकटी काडाय सांगत असाल तर झेंगट्याला ते जमायचं न्हाय अन्ना ! आजपन तुमच्या गावाचं नाव आमच्या दिलावर लिवलेलं हाय. पन आपमाण आयकून घ्यून हितं ऱ्हायलो तर मी दोन बापाचा, अन्ना."

"आरं पन झेंगट्या, मानूस म्हनल्याव कमी जास्त हुनारच. जितं जाशील तितं हे उन्नीस बीस हायच की. तू म्हनशील तेच समद्यानी आयकून घ्याचं ही मोगलाई झाली झेंगट्या"

"छगन्या, अबी बच्चा है तू. तुला न्हाय कळायचं. आरं रोज पाचपंचवीस लोकांनी पायावर डोकं ठेवावं आशी चीज है आपुन. दुनियेनं आपल्याया आजून ओळखलं नाय छगन्या. डाक्तर, प्रोफेसर मंडली आपली फ्यान हैत. जिंदगी आपुन बगीतलेली हाय छगन्या. रंडीबाजारात चाय फिरवलेला मानूस हाय आपुन. उस्मानभाईपासून सुलोचनाताईपर्यंत पैचान हाय आपली. आरं, हरामगिरी केली आस्ती तं आज पच्चीस माळ्याची बिल्डिंग उठवली अस्ती आपुन. पन म्हनलं मालिक, नंगा आया है, नंगा जायेगा. पन साला इज्जतनं ऱ्हानार आपुन. साला फुटपाथवर झोपंन, पन हररोज सक्काली मर्सिडिसवाल्यानं सलाम ठोकला पायजे आपल्याला. ज्या दिवशी मर्सिडीसवाला नखरा करेल, त्या दिवशी आपुन म्हनेल बॉस, खुदा हाफिज. आजसे अपुन तेरे फूटपाथपे नही सोयेगा. आपल्याला फूटपाथची काय कमी हाय का छगन्या?"

"कबूल हाय दादा. पर ऐसे कितने बार पिल्लेवाले बिल्लीकी तरह जगह बदलेगा तू? आपुन मनोलीसे उठके मायगांव गये, उदरसे फिर उल्लासनगर आये"

"इतून कुठे किस्मत न्हेईल तिकडे जानार छगन्या. पन आपल्याला सलाम पायजे बस. आपल्याला कुनी चालेंज केलं नाय पायजे. तो शेंडीला गाट न मारता फिरनारा लय नडतो आपल्याशी. पन त्यालाबी म्हनलो आपन, खुश रहो यार, अब हम तो सफर करते है. आपुन फकीर आदमी है. एक तेरा साथ है, डोक्याशी एक धोंडा, पायाशी एक गुंडा, उपर आसमान, अपुन खुश है"

"झेंगट्या, मर्सिडीसवाल्या शेटचा ड्रायवर आलाय बग. आवाज बंद कर नायतर पोलीसला बोलवीन म्हनतोय!"

"देखा? केला की नाय शेवटी सलाम? अब हम यही रहेंगे. शेवटी आपलं प्रिंशिपल है बंधो!"

5 comments:

Tatyaa.. said...

>>जितं जाऊ तितं गाव गोळा करु, कळ्ळं का? आपुन कलाकार आदमी है राजा! नुस्ता मिस्सळपावचा गाडा उगडला तर हजारानं गिराईक यील.

हान तुज्या मारी! हे मातुर ब्येस बोल्लास बघ ऐहिका! मिसलपावचा गाडा आता लवकुरच उगडायचा म्हणतुया..

>>पन सरपंचाबरुबर एकदा भांडान झालं तवा म्हनलं अन्ना, आमचा रामराम घ्या.

महेश वेलणकरास्नी 'अन्ना' म्हनत्यात ते ठावं नव्हतं! ;)

>>आजपन तुमच्या गावाचं नाव आमच्या दिलावर लिवलेलं हाय. पन आपमाण आयकून घ्यून हितं ऱ्हायलो तर मी दोन बापाचा, अन्ना."

क्या बात है! ;)

>>आरं रोज पाचपंचवीस लोकांनी पायावर डोकं ठेवावं आशी चीज है आपुन.

अहो नाही हो ऐहिकराव, आपला काहीतरी गैरसमज होतो आहे. अहो इतका वाईट आणि आपमतलबी माणूस नाही हो मी! ;)

>>रंडीबाजारात चाय फिरवलेला मानूस हाय आपुन. उस्मानभाईपासून सुलोचनाताईपर्यंत पैचान हाय आपली. आरं, हरामगिरी केली आस्ती तं आज पच्चीस माळ्याची बिल्डिंग उठवली अस्ती आपुन.

ओहो! क्या बात है. याला म्हन्त्यात माज! मस्त लिवलंया..

>>आपुन मनोलीसे उठके मायगांव गये, उदरसे फिर उल्लासनगर आये"

वा! मनोगत, मायबोली, आणि उपक्रमची टोपणनांवे आवडली! ;)

>>तो शेंडीला गाट न मारता फिरनारा लय नडतो आपल्याशी.

हा मनुष्य कोण हे मात्र ल़क्षात नाही आलं बुवा!

असो! ऐहिकराव लेख बाकी फक्कड! अहो किती माराल आमची जाहीरपणे! चलो कोई बात नही..आपुन साला हैईच नंगा फकीर! ;)

अवांतर - आपला मनोगतावरचा 'थोरामोठ्यांच्या सहवासात'हा लेख देखील मला अतिशय आवडला होता.

असो!

आपलाच,
झेंगट्या!

Prakash Ghatpande said...

एक तेरा साथ है, डोक्याशी एक धोंडा, पायाशी एक गुंडा, उपर आसमान, अपुन खुश है"
लई भारी माझ्या डोळ्यासमोर गणगौळणच उभी राहिली. मस्त फार्सिकल विडंबन. तात्याने दिलेली दाद हाच याच या विडंबनाचा सन्मान

Unknown said...

नुस्ता मिस्सळपावचा गाडा उगडला तर हजारानं गिराईक यील. कुनाचं मिंदं हून ऱ्हायला आपुन काय तुज्यावानी छगन हाय का?"

हा हा हा! जबरा! "तुझ्यावानी छगन हाय का?" हा हा हा लय भारी.

साला फुटपाथवर झोपंन, पन हररोज सक्काली मर्सिडिसवाल्यानं सलाम ठोकला पायजे आपल्याला. ज्या दिवशी मर्सिडीसवाला नखरा करेल, त्या दिवशी आपुन म्हनेल बॉस, खुदा हाफिज. आजसे अपुन तेरे फूटपाथपे नही सोयेगा. आपल्याला फूटपाथची काय कमी हाय का छगन्या?"

हीहीहीहीही! :))))) लय भारी लय भारी.. जमिनीवर पडायचाच बाकी हे!

पर ऐसे कितने बार पिल्लेवाले बिल्लीकी तरह जगह बदलेगा तू?

"पिल्लेवाली बिल्ली" हेहेहेहेहेहेहेहेहेहे हीहीहीहीहीही!

"झेंगट्या, मर्सिडीसवाल्या शेटचा ड्रायवर आलाय बग. आवाज बंद कर नायतर पोलीसला बोलवीन म्हनतोय!"

"देखा? केला की नाय शेवटी सलाम? अब हम यही रहेंगे. शेवटी आपलं प्रिंशिपल है बंधो!"


हाहाहाहाहा! जबराट! लईच भारी, जवाब नही! क्या केहने! माठ्याचा म्हणजे तुम्ही अगदीच करून टाकलात!

Anonymous said...

wow gold!All wow gold US Server 24.99$/1000G on sell! Cheap wow gold,wow gold,wow gold,Buy Cheapest/Safe/Fast WoW US EUwow gold Power leveling wow gold from the time you World of Warcraft gold ordered!fanfan980110

wow power leveling wow power leveling power leveling wow power leveling wow powerleveling wow power levelingcheap wow power leveling wow power leveling buy wow power leveling wow power leveling buy power leveling wow power leveling cheap power leveling wow power leveling wow power leveling wow power leveling wow powerleveling wow power leveling power leveling wow power leveling wow powerleveling wow power leveling buy rolex cheap rolex wow gold wow gold wow gold wow goldfanfan980110
rfrfr

Anonymous said...

hguj升降机 同声翻译 同声传译 同声翻译设备 文件柜 会议设备租赁 同声传译设备租赁 表决器租赁 更衣柜 钢管 无缝钢管 服务器数据恢复 论文发表

升降平台 登车桥 升降机 升降机 铝合金升降机 液压升降机 液压机械 升降平台 升降台 高空作业平台 升降机 升降平台 弹簧 数据恢复 RAID数据恢复 无缝管 博客 Google排名 网站优化

WOW Gold WOWGold World Of Warcraft Gold WOW Power Leveling WOW PowerLeveling World Of Warcraft Power Leveling World Of Warcraft PowerLeveling

Breathalyzer Gas Alarm Breathalyser Co Alarm Co Detector Alcohol Tester Alcohol Tester Gas Detectorbgh