चांगभलं दादांनू, सदानंदाचा येळकोट घ्या तायांनू!
"आरं पन माजं आयकून तं घेशील की नाय मर्दा! आरं लेका झेंगट्या, तू हितं आलास म्हून मी आलो, त्वा सांगितलंस की आता त्या गावाच्या वाटंलादिकील जायाचं न्हाय, म्हून मीबी तिकडं सा म्हैन्यात न्हायी गेलो, आन आता तू म्हनतुयास की हितनंबी आता गाशा गुंडाळायचा, तवा कसंकसं?"
"कसंकसं म्हंजी? छगन्या, तू कायी माजी लग्नाची बाईल न्हवंस. भटाबामनासमोर डोरलं न्हायी घातलं म्या तुज्या गळयात. तुला संगट यायचं तं ये, न्हायतर ऱ्हायलं, पन मी आता हितनं जानार म्हंजी जानार. आरं आपल्याला काय दुसरी गावं न्हायती का? आरं आपुन जितं जाऊ तितं गाव गोळा करु, कळ्ळं का? आपुन कलाकार आदमी है राजा! नुस्ता मिस्सळपावचा गाडा उगडला तर हजारानं गिराईक यील. कुनाचं मिंदं हून ऱ्हायला आपुन काय तुज्यावानी छगन हाय का?"
"आरं दादा, मला काय ठाव न्हाय का त्ये? आन तुला सोडून जायचं आस्तं तर इतवर का आलु अस्तू मी तुज्यासंगट? आरं तू दोस्त आपला झेंगट्या! तू क्रिष्न तर आपुन सुदामा, तू मुन्ना तर आपुन सर्किट"
"व्हय न्हवं? मग एक सबुद न बोल्ता आपलं गटुरं बांद बगू! आरं जितं आपली इज्जत न्हाय तितं मुर्दाडपनानं ऱ्हायला आपुन काय आक्करमाशे हाय का? त्या आदीच्या गावात इक्ती वरसं ऱ्हायलो, आपला गोतावळा गोळा केला, पन सरपंचाबरुबर एकदा भांडान झालं तवा म्हनलं अन्ना, आमचा रामराम घ्या. हितं आजवर राजा म्हून ऱ्हायलोय, आता आमाला तुमी खरकटी काडाय सांगत असाल तर झेंगट्याला ते जमायचं न्हाय अन्ना ! आजपन तुमच्या गावाचं नाव आमच्या दिलावर लिवलेलं हाय. पन आपमाण आयकून घ्यून हितं ऱ्हायलो तर मी दोन बापाचा, अन्ना."
"आरं पन झेंगट्या, मानूस म्हनल्याव कमी जास्त हुनारच. जितं जाशील तितं हे उन्नीस बीस हायच की. तू म्हनशील तेच समद्यानी आयकून घ्याचं ही मोगलाई झाली झेंगट्या"
"छगन्या, अबी बच्चा है तू. तुला न्हाय कळायचं. आरं रोज पाचपंचवीस लोकांनी पायावर डोकं ठेवावं आशी चीज है आपुन. दुनियेनं आपल्याया आजून ओळखलं नाय छगन्या. डाक्तर, प्रोफेसर मंडली आपली फ्यान हैत. जिंदगी आपुन बगीतलेली हाय छगन्या. रंडीबाजारात चाय फिरवलेला मानूस हाय आपुन. उस्मानभाईपासून सुलोचनाताईपर्यंत पैचान हाय आपली. आरं, हरामगिरी केली आस्ती तं आज पच्चीस माळ्याची बिल्डिंग उठवली अस्ती आपुन. पन म्हनलं मालिक, नंगा आया है, नंगा जायेगा. पन साला इज्जतनं ऱ्हानार आपुन. साला फुटपाथवर झोपंन, पन हररोज सक्काली मर्सिडिसवाल्यानं सलाम ठोकला पायजे आपल्याला. ज्या दिवशी मर्सिडीसवाला नखरा करेल, त्या दिवशी आपुन म्हनेल बॉस, खुदा हाफिज. आजसे अपुन तेरे फूटपाथपे नही सोयेगा. आपल्याला फूटपाथची काय कमी हाय का छगन्या?"
"कबूल हाय दादा. पर ऐसे कितने बार पिल्लेवाले बिल्लीकी तरह जगह बदलेगा तू? आपुन मनोलीसे उठके मायगांव गये, उदरसे फिर उल्लासनगर आये"
"इतून कुठे किस्मत न्हेईल तिकडे जानार छगन्या. पन आपल्याला सलाम पायजे बस. आपल्याला कुनी चालेंज केलं नाय पायजे. तो शेंडीला गाट न मारता फिरनारा लय नडतो आपल्याशी. पन त्यालाबी म्हनलो आपन, खुश रहो यार, अब हम तो सफर करते है. आपुन फकीर आदमी है. एक तेरा साथ है, डोक्याशी एक धोंडा, पायाशी एक गुंडा, उपर आसमान, अपुन खुश है"
"झेंगट्या, मर्सिडीसवाल्या शेटचा ड्रायवर आलाय बग. आवाज बंद कर नायतर पोलीसला बोलवीन म्हनतोय!"
"देखा? केला की नाय शेवटी सलाम? अब हम यही रहेंगे. शेवटी आपलं प्रिंशिपल है बंधो!"
Thursday, June 21, 2007
Subscribe to:
Posts (Atom)